एक्स्प्लोर
World Sparrow Day 2022 : चिमण्या कुठं गेल्या? आज चिमणी दिन... चिमण्यांना वाचविण्यासाठी 'हे' करूयात
World Sparrow Day 2022
1/7

‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव झालीय. अन् यातूनच 2010 पासून 20 मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जातोय.
2/7

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक घटकाला जपणे महत्वाचे आहे. आपलं जगणं आणि पुढच्या पिढीचं बालपण रम्य करण्यासाठी चिऊताई नक्कीच हवी.
3/7

सध्या देशभरातील चिमण्यांच्या अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील अनेक जाती तर इतिहासजमा झाल्या आहेत. 'पासर डोमेस्टीकस' (Passer Domesticus) अर्थातच 'हाऊस स्पॅरो' (House Sparrow) ही चिमण्यांची जात सर्व जगभरात आहे.
4/7

जगभरात 26 जातीच्या चिमण्यांची नोंद आहे. मात्र या 26 पैकी फक्त 23 चिमण्यांची छायाचित्र सध्या उपलब्ध आहेत. चिमण्या लुप्त होण्यामुळे पर्यावरणापुढे अनेक धोके उभे राहिले आहेत.
5/7

चिमण्यांना वाचविण्यासाठी - उन्हाचा दाह वाढल्याने या पक्षांच्या पाण्याच्या सोयीसाठी घरात किंवा अंगणात पाण्याची व्यवस्था करावी. त्यासाठी एखादे मातीचे भांडे पक्ष्यांना पाणी पिणे पिणे शक्य होईल अशा ठिकाणी ठेवावे.
6/7

या पक्षांसाठी कमीत कमी दहा फुट उंचीवर लाकडाचे किंवा कपट्याचे कृत्रिम घरटे तयार करावे.
7/7

पक्षांना लागणारे धान्य दररोज त्यांना उपलब्ध होईल अशा पद्धतीने टाकणे. उरलेले अन्न पक्षांना टाकणे.
Published at : 20 Mar 2022 12:52 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























