सांगलीत 54 लाख प्रति तांदळातून साकारली शिवरायांची भव्य प्रतिकृती
सांगलीत 54 लाख प्रति तांदळातून शिवरायांची भव्य प्रतिकृती साकारली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील अमरापूर या विद्यालयात महाराजांची तांदळाच्या माध्यमातून प्रतिकृती साकारण्यात आली.
विद्यालयाचे उपक्रमशील कलाशिक्षक नरेश लोहार यांच्या संकल्पनेतून तब्बल 54 लाख तांदळातून भव्य दिव्य प्रतिकृती साकारली आहे.
लोहार यांच्या समवेत विद्यालयातील इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी खूप मेहनत घेत 17 बाय 25 फुट या साईजमधे ही प्रतिकृती अवघ्या 2 दिवसात 19 तासात पूर्ण केली आहे.
तांदळाला अॅक्रलिक रंगाच्या माध्यमातून विविध रंगछटा देण्यात आल्या आहेत.
शालेय विद्यार्थ्यांनी शिवरायांचा आदर्श घ्यावा व प्रत्येक विद्यार्थ्यानी एक उत्तम कला जोपासवी अशी भावना व्यक्त करत ही प्रतिकृती साकारली आहे.
नरेश लोहार यांनी यापूर्वी 6 डिसेंबर 2022 रोजी साडे तीन हजार चौरस फुट या आकारांत 3221 वह्या पुस्तकांमधून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जगातील पहिली प्रतिकृती साकारताना अनोखे अभिवादन केले होते.
या दुसऱ्या अनोख्या उपक्रमाबद्दल सर्वत्र त्यांचे व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक होत आहे.
विद्यार्थी व पालकांसाठी ही प्रतिकृती पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा ही विद्यार्थ्यांना बालवयातच मिळाली पाहिजे, अशी भूमिका यामागे आहे.