Shiv Thakare : वीणासोबतच्या नात्याबद्दल शिव ठाकरे म्हणाला...

Shiv Thakare : बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर शिव वीणाबद्दल भाष्य करत म्हणाला,वीणा आणि माझा ब्रेकअप झाला असला तरी मी बिग बॉसमध्ये सहभागी होण्यापूर्वी आम्ही संवाद साधला होता.

Shiv Thakare

1/10
'बिग बॉस' फेम शिव ठाकरे सध्या चर्चेत आहे.
2/10
आता अमरावतीकरांनी शिवचं जंगी स्वागत केलं असून नुकत्याच एका मुलाखतीत शिवने वीणा जगतापबद्दल भाष्य केलं आहे.
3/10
'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वात शिव ठाकरे आणि वीणा जगतापने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
4/10
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत शिव वीणाबद्दल भाष्य करत म्हणाला,"वीणा आणि माझा ब्रेकअप झाला असला तरी मी बिग बॉसमध्ये सहभागी होण्यापूर्वी आम्ही संवाद साधला होता.
5/10
शिव ठाकरे पुढे म्हणाला,"बिग बॉस मराठी 2' आणि 'बिग बॉस 16' हे दोन्ही माझ्यासाठी खूप खास आहेत.
6/10
शिव ठाकरे आणि वीणा जगताप 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाले होते.
7/10
बिग बॉसच्या घरातचं त्यांची चांगली मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
8/10
शिव आणि वीणाचा नंतर ब्रेकअप झाला आणि त्यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली.
9/10
शिव ठाकरे आणि वीणा जगतापची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती.
10/10
शिव आणि वीणा एकत्र यावे, अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे.
Sponsored Links by Taboola