सांगलीत कृष्णेचं पात्र कोरडंठाक; भीषण पाणी टंचाई उद्भवणार, कोयना धरणातून विसर्गाची गरज भासणार

ऑगस्ट महिन्यामध्ये कृष्णा नदीचं हे असं कोरडं पात्र सांगलीकर बऱ्याच वर्षांनी पाहत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सध्या आयर्विन पुलाच्या खालचे कृष्णा नदीचं कोरडं पात्र दिसू लागलं आहे.

सध्यातरी नदीनं काही ठिकाणी तळ गाठला असला तरी सांगली, कुपवाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेलजवळ आठवडाभर पाणी उपसा होईल, इतका पाणीसाठा आहे.
आठवड्याभरात मात्र पावसानं दमदार हजेरी लावली नाही, तरमात्र कृष्णा नदीत कोयनेतून विसर्ग करण्याची गरज लागू शकते.
जर पावसानं अशीच ओढ घेतली तर मात्र पाणी टंचाई आणखी वाढू शकते.
दुसरीकडे पुढील महिन्यात गणपतीचे आगमन-विसर्जन होणार असल्यानं मोठा पाऊस पडला नाही, तर गणपती विसर्जनाचाही प्रश्न उभा राहिला आहे.
गणपती विसर्जनासाठी महापालिका प्रशासनानं पाटबंधारे विभागाला कोयना धरणातून नदीत पाणी सोडण्याबाबत विनंती केली आहे.