'या मेरे अल्लाह करम फरमाना', पावसासाठी मुस्लीम बांधवांची विशेष नमाज अदा; पाहा फोटो
यामुळे पैठणच्या आडूळ गावात मुस्लिम बांधवांनी जोरदार पाऊस पडावा यासाठी ईदगाह मैदानावर विशेष नमाज अदा करत अल्लाहकडे पावसासाठी साकडे घातले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपावसाअभावी पिकांनी माना टाकल्या आहेत. पाण्याचे स्त्रोत आटत चालले आहेत. यंदा अद्यापही एकही जोरदार पाऊस न झाल्याने विहिरी, तलाव, बोअरवेल्सच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही.
पिकांना पाणी कसे द्यायचे ? हा तर प्रश्न आहेच शिवाय पाणीटंचाईचा आणि चाराटंचाईचा सामनाही नागरिकांना करावा एकुणच वातावरण चिंताजनक असल्याने मुस्लीम बांधवांनी विशेष नमाज अदा केली.
आडूळ येथील मुस्लिम बांधवांनी अल्लाहकडे पाऊस पडण्यासाठी विशेष नमाज अदा करत साकडे घातले.
आडूळ गावातील खुल्या मैदानात असलेल्या ईदगाहवर ही नमाज अदा करण्यात आली.
अल्लाह दयाळु आहे, तो पाऊस पाडून सर्वांना सुखी ठेवील म्हणत मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन नमाज अदा केली.
यावेळी आडूळ गावातील आणि परिसरात राहणाऱ्या अंदाजे 4 हजार मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन विशेष नमाज अदा केली.
तसेच रोजच्या नमाजमध्ये देखील अल्लाहाकडे पावससाठी प्रार्थना करण्याची सूचना यावेळू उपस्थित असलेल्या मुफ्ती यांच्याकडून देण्यात आल्या.
सोबतच औरंगाबाद शहरातील छावणी ईदगाह मैदानावर देखील पाऊस पडावा म्हणून विशेष नमाज अदा करण्यात आली.