Mumbai Rain : मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात
मुंबईसह उपनगरात सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपावसामुळं काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळं संथ गतीनं वाहतूक सुरु आहे.
काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईत पावसाला (Mumbai Rain) सुरुवात झाली आहे.
दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पहाटेपासून अधून मधून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
आणि पश्चिम उपनगरात पहाटेपासून अधून मधून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरात सकाळी सहा वाजल्यापासून पाऊस सुरू आहे. दरम्यान, कुर्ला (Kurla) पश्चिमेत सीएसटी रोडवर परिसरात पावसाचा जोर जास्त असल्यामुळं सीएसटी रोड परिसरात रस्त्यावर दीड ते दोन फूट पाणी भरलं आहे.
कुर्ला परिसरामध्ये अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. यामुळं कुर्ला सीएसटी रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे.
सध्या कुर्ला परिसरात पावसाचे जोर कमी झाला आहे. त्यामुळं सीएसटी रोडवर भरलेलं पाणी कमी होत आहे.
आज मुंबईत पावसाचा इशारा हवामान विभाकडून देण्यात आला आहे.
मुंबईसह कोकणात जोरदार तर सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मध्यम पावसाची शक्यता मात्र कायम आहे.