Sangli Rain Update: चांदोली धरणातून विसर्ग वाढवला; धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधरणातून आज (27 जुलै) पुन्हा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
विद्युत निर्मिती प्रकल्पातून 1630 क्युसेक व वक्राकार दरवाज्यातून 5150 क्युसेक विसर्ग असा एकूण 6780 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
चांदोली धरणाची 34.40 टीएमसी क्षमता आहे.
धरणात आज अखेर एकूण पाणीसाठा 28.93 टीएमसी म्हणजेच 84.10 टक्के साठा झाला आहे.
कोकरूड-रेठरे बंधारा अद्याप पाण्याखाली असल्याने वाहतूक बंद आहे.
वारणा नदीवरील मांगले-सावर्डे बंधारा खुला झाला आहे.
चांदोली धरण, पाणलोट क्षेत्रातील निवळे, पाथरपुंज, धनगरवाडा येथे अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
अतिवृष्टीमुळे प्रकल्प क्षेत्रात पर्यटकांना बंदी घातली आहे.
image 11