Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Conjunctivitis : डोळ्याच्या संसर्गाची लक्षणे कोणती, कशी काळजी घ्यावी?
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत असल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात डोळ्याच्या साथीने शिरकाव केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलहान मुलांसह वृद्धांनाही संसर्गजन्य आजाराची लागण होत आहे.
हा आजार संसर्गजन्य असल्याने इतरांना अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.
या आजाराची लक्षणे कोणती आहेत, ती जाणून घेऊया.
डोळ्यात पाणी येणं, डोळ्यात पिवळी घाण येणं, डोळे लाल होणं, डोळ्यांवर सूज येणं, डोळ्यांची जळजळ होणं ही डोळ्याच्या आजाराची लक्षणे आहेत.
दरम्यान डोळ्यांचा संसर्ग वाढत असल्याचे नागरिकांनी घाबरुन न जाता योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात येत आहे.
डोळे आल्यास काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
संसर्ग झाल्यास डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत धुवावेत. दुसऱ्यांचा रुमाल, टॉवेल, कपड्यांनी डोळे पुसू नये
तसंच डोळ्यांना सतत स्पर्श करु नये, सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, अशी काळजी घेणं गरजेचं आहे.