Rain : नागपुरात पावसामुळं रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वेणा नदीला पूर
राज्याच्या विविध भागात सध्या जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपावासामुळं वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, नागपूर (Nagpur) जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. जोरदार पावसामुळं नागपूरचा अंबाझरी तलाव ओहरफ्लो झाला आहे.
शहरातील अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे.
हिंगणा भागातील वेणा नदीला पूर आला आहे. यामध्ये काही नागरिक अडकले होते, त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.
नागपूरमध्ये रात्री दहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत 164 मिलीमीटर पाऊस कोसळल्याची नोंद झाली आहे.
नागपूरमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे.
नागपूरच्या नरेंद्रनगर पुलाखाली दोन ट्रक पाण्यात अडकले आहेत. तसेच नागपूर विमातळाच्या प्रवेशदारावर भयानक चित्र आहे.
आज गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
बंगालच्या उप सागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नागपूर वेध शाळेने हा अलर्ट दिला आहे.
पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदरी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.