Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सांगली : आटपाडी तालुक्यातील खरसुंडीत जनावरांच्या यात्रेत सात कोटींची उलाढाल, तीन राज्यातील शेतकरी सहभागी
सांगली आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील खिलार जनावरांच्या पाच दिवसांच्या यात्रेची सांगता झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखिलार जनावराच्या यात्रेत तब्बल सात कोटींची उलाढाल झाली.
कोरोनानंतर गेल्यावर्षी यात्रा झाली. परंतु, यंदाच्या यात्रेला मोठा प्रतिसाद लाभला.
तीन राज्यातील शेतकरी आणि व्यापारी या यात्रेत सहभागी झाले होते.
खिलार जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी ही यात्रा तीन राज्यात प्रसिध्द आहे.
महाराष्ट्र,कर्नाटक आणि आंध्रप्रदेश राज्यातील शेतकरी आणि व्यापारी देखील या यात्रेत सहभागी झाले होते.
यात्रेत सांगली,सातारा आणि कोल्हापूर भागातील शेतकरी जनावरे विक्रीसाठी आली होती.
पुणे जिल्ह्यातील आणि राज्यातील तसेच पर राज्यातील शेतकरी जनावरे खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते.
यात्रेत खिलार गाई,लहान खोंड, प्रजोत्पादनासाठी आणि शर्यतीसाठी वापरले जाणारे वळू आणि शेती कामासाठी वापरले जाणारे बैल खरेदीसाठी मोठया प्रमाणात आले होते.
यात्रेत तब्बल 20 हजार जनावरे दाखल झाली होती. माणदेशी जातिवंत खिलार जनावरे वैशिष्ट्यपूर्ण असतात.
अत्यंत आकर्षक ही पाळीव जनावरे चपळ आणि काटक असतात.
शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या बैलांना चांगली किंमत मिळाली. खोंडांना देखील चांगली मागणी होती.
खोंडांना 35 ते 70 आणि बैलांना 75 हजार ते सव्वा लाख रुपयांचा दर मिळाला.