Rohit Sharma in IPL : मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची 'विराट' कामगिरी, आयपीएलमध्ये 6000 धावा पूर्ण
पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई संघाने 192 धावा केल्या. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघ 178 धावांवर ऑल आऊट झाला. हा सामना मुंबईने 14 धावांनी जिंकला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर आणखी एक विक्रम नोंदवण्यात आला आहे.
रोहित शर्माच्या त्याच्या आयपीएलच्या कारकिर्दीतील 6000 धावा पूर्ण केल्या आहे.
हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने 28 धावा केल्या. यासोबतच त्याच्या इंडियन प्रीमियर लीगमधील सहा हजार धावांचा टप्पा पूर्ण झाला आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला. रोहित शर्माने आयपीएल कारकिर्दीतील सहा हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.
ही कामगिरी करणारा रोहित शर्मा आयपीएलमदील चौथा खेळाडू ठरला आहे. रोहितने सामन्याच्या 2.2 षटकात वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर चौकार मात आयपीएलमध्ये सहा हजार धावा पूर्ण केल्या.
आयपीएलच्या कारकिर्दीमध्ये 6000 धावा करणारा रोहित शर्मा हा चौथा खेळाडू आहे. त्याच्या आधी विराट कोहली, शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांनी सहा हजार धावांचा टप्पा गाठला आहे.
रोहित शर्माने आतापर्यंत 232 सामन्यांमध्ये 6 हजार 14 धावा केल्या आहेत. यामध्ये रोहित शर्माने एक शतक आणि 41 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच, त्याने 535 चौकार आणि 247 षटकार ठोकले आहेत.
रोहितची आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्या 109 धावांची आहे. तसेच, आयपीएलमधील त्याचा स्ट्राइक रेट 130.03 असून सरासरी धावसंख्या 30.22 आहे. रोहित एक चांगला क्षेत्ररक्षकही आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 97 झेल घेतले आहेत.
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मुंबई इंडियन्स हा पाच वेळ आयपीएल चॅम्पियन ठरलेला एकमेव संघ आहे.