Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cotton : नंदुरबार बाजार समितीत 75 हजार क्विंटल कापसाची खरेदी
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Nandurbar Market committee) मोठ्या प्रमाणात कापसाची (Cotton) आवक वाढली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमागील वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत 75 हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. मागील वर्षी 15 एप्रिलपर्यंत अवघा 56 हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली होती
यावर्षी बाजार समितीमध्ये मिळणाऱ्या चांगल्या दरामुळं शेतकरी नंदुरबार बाजार समितीला कापूस विक्री करण्यास प्राधान्य देत असल्याचं चित्र आहे.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 500 क्विंटल कापसाची आवक होत आहे. कापसाला सात हजार पाचशे ते आठ हजार दोनशेपर्यंत दर मिळत असल्यानं जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी बाजार समितीला पसंती दिली आहे.
कापसाच्या दरात आणखी वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मागील वर्षी कापसाचा दर हा 11 हजारांच्या आसपास गेला होता. यवर्षी मात्र, आठ हजार रुपयापर्यंतचा दर मिळत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात एक लाख 16 हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी कापसाला मिळणारा दर कमी असल्यानं शेतकऱ्यांनी आपला कापूस घरातच साठवून ठेवण्यावर भर दिला होता
आता कापसाच्या दरात थोडी वाढ झाल्यानं शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीनं 15 एप्रिलपर्यंत 75 हजार क्विंटल कापूस खरेदीचा टप्पा पार केला आहे. मागील वर्षी 15 एप्रिल पर्यंत 55 हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली होती.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आवकही जास्त असल्याचे चित्र आहे. खासगी व्यापारी कापसाला सात हजार ते सात हजार पाचशे दर देत आहेत. तर बाजार समितीत कापसाला सात हजार पाचशे ते आठ हजार दोनशे पर्यंत प्रतवारीनुसार भाव मिळत असल्यानं शेतकरी कापूस विक्रीसाठी बाजार समितीला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.