मान्सूनसोबत चातकही आला... कृष्णाकाठी आफ्रिकन पाहुणा 'चातक' दाखल; गतवर्षीप्रमाणे यंदाही उशीरा आगमन
आभाळाकडे डोळे लाऊन बसलेल्या शेतकऱ्यांना पाऊस येणार असल्याची वर्दी निसर्गातील पक्षांकडून मिळत असते. सध्या मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याचबरोबर चातक हा पाहुणा देखील आज थेट आफ्रिकेतून पावसाचा सांगावा घेऊन कृष्णाकाठावर दाखल झाला आहे.
कुहू कुहू करणारी कोकीळा, शेतकऱ्यांना पेरते व्हा अशी साद घालणारा पावशा, हे नेहमीच बळीराजाला पावसाच्या आगमनासाठी सज्ज ठेवत असतात.
काळ्या पांढऱ्या चातकाच्या डोक्यावर एखाद्या राजकुमाराच्या डोक्यावर शोभावा असा काळा तुरा असतो. त्याचा साळुंकी एवढा आकार, लांब शेपूट, शरीराचा वरील सर्व भाग काळ्या रंगाचा असतो.
हनुवटी, मान आणि पोटाचा भाग पांढरा असतो. पंखांवर रुंद पांढरा पट्टा असल्यामुळे उडतानाही हा चातक पक्षी सहज ओळखतो.
शेपटीतील पिसांची टोके पांढरी असतात. डोळे तांबडे तपकिरी, चोच काळी आणि पाय काळसर निळे असतात. हे एकेकटे किंवा यांची जोडी असते. हा चातक पक्षी सध्या पलुस तालुक्यातील कृष्णाकाठावर दाखल झाला आहे.
कोकीळा, पावशा, कारूण्य कोकीळा, बुलबुल, रॉबीन या गाणार्या पक्षांसोबतच चातकाच्या सुरांची रानमैफल कृष्णाकाठावर रंगते आहे. तर या चातक पक्षाचा मुक्काम जून ते सप्टेंबर म्हणजे संपूर्ण पावसाळ्यात राहणार आहे.
चातकाची वीण जूनपासून ऑगस्टपर्यंत होते. मीलन काळात हे पक्षी खूप गोंगाट करतात. कोकिळेप्रमाणे याही पक्ष्यात भ्रूण परजीविता दिसून येते. मादी आपली अंडी छोट्या सातभाई पक्ष्याच्या घरट्यात घालते.
सातभाई हा लहान पक्षी असल्यामुळे भिऊन घरट्यातून पळून जातो आणि काही आडकाठी न येता तिला सातभाईच्या घरट्यात अंडे घालता येते.
अंड्याचा रंग सातभाईच्या अंड्याप्रमाणेच आकाशी असतो. सप्टेंबरच्या सुमारास सातभाईची पिले अंड्यांतून बाहेर येतात. त्यांमध्येच चातकाचे पिल्लू असते.
चातकाचे पिल्लू तपकिरी रंगाचे असून त्याच्या पंखांवर पिवळसर आडवा पट्टा असतो.