Health Tips: आहारात समाविष्ट करा लाल तांदूळ; आरोग्याशी संबंधित 'या' समस्या होतील दूर, पाहा...
लाल भात खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. हा भात खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. लाल भात हा फॅट फ्री असतो, जे लोक हा भात रोज खातात त्यांना लठ्ठपणाचा धोका कमी असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलाल तांदूळ अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. त्यामुळे लाल तांदळाचा भात खाल्ल्याने कर्करोग, हृदयरोग आणि मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो.
लाल तांदळात भरपूर फायबर असते, जे पचनासाठी खूप महत्वाचे असते. लाल तांदळाच्या भातामुळे आतड्याची हालचाल सुधारते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर राहते.
लाल तांदळात मॅग्नेशियमची चांगली मात्रा देखील आढळते आणि ते हाडांच्या आरोग्यासाठी विशेषतः फायदेशीर आहे. यामुळे सांधेदुखीच्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.
लाल तांदळात पोटॅशियम, लोह आणि मॅग्नेशियम असे तीनही घटक असतात, जे रक्तदाब आणि चयापचय चांगले राखण्यास मदत करतात. लाल तांदळाचा भात रक्तपेशींच्या निर्मितीस प्रोत्साहन देतो.
लाल तांदूळ कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतो. एका अभ्यासानुसार, ज्या लोकांनी 6 महिने लाल भात खाल्ला त्यांच्यामध्ये खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी झाल्याचे दिसून आले.
लाल तांदूळ जीवनसत्त्वे आणि खनिजांनी भरलेला असतो, लाल तांदळाच्या भातामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.