PHOTO : पुरोगामी संघटनांकडून आज सांगली बंदची हाक
सांगली शहरात बहुजन समाजातील महामानवांच्या बदनामीच्या निषेधार्थ आणि महापुरुषांच्या सन्मानार्थ सर्व पुरोगामी संघटनाकडून सांगली शहर बंदची हाक देण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसनदशीर मार्गाने सर्व पुरोगामी संघटनाकडून हा निषेध व्यक्त केला जाणार असून त्यासाठी सर्व संघटना मधील कार्यकर्ते, शिवप्रेमी, बाबासाहेब आंबडेकर प्रेमी स्टेशन चौक सांगली येथे सकाळी 10 वाजता एकत्र जमणार आहेत.
तिथून मारुती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यत पदयात्रा काढून महाराजाना वंदन केले जाणार आहे.
याचवेळी शहरातील बाबासाहेब आंबडेकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह अन्य महापुरुषांच्या पुतळ्यला देखील अभिवादन केले जाणार आहे.
महामानवांच्या बदनामीच्या निषेधार्थ याआधी 17 डिसेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यासमोर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्या विरोधात आणि निषेधार्थ ठिय्या आंदोलन केले होते.
आता या निषेध आंदोलनाचा दूसरा टप्पा म्हणून महापुरुषांच्या सन्मानार्थ अत्यावश्यक सेवा वगळून सांगली बंद ठेवण्याचा सर्व पुरोगामी संघटनानी आज निर्णय घेतला आहे.