Sangli: सांगली फेस्टिव्हलमध्ये भारतातील सर्वात मोठ्या पॅन्टचं सादरीकरण, 26 फुट उंची तर 15 फुट इतकी पन्टची रुंदी
सांगली फेस्टीव्हलमध्ये भारतातील सर्वात मोठी पॅन्ट साकारण्यात आली आहे.सांगलीतील या पँटची उंची 26 फुट तर रुंदी 15 फुट इतकी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजागतिक टेलर्स दिनाचे औचित्य साधून 28 फेब्रुवारी 2022 रोजी ही पॅन्ट तयार करण्यात आली आहे.
मिरजमधील स्टाईलअप टेलरचे इम्रान मलिदवाले आणि त्यांच्या टीमने ही भली मोठी पॅन्ट डिझाइन केली आहे
सांगलीत भरलेल्या फेस्टिव्हल मध्ये ही पॅन्ट प्रदर्शनात ठेवण्यात आलेली होती. ही पॅन्ट पाहाण्यासाठी लोकं मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत
सांगलीमध्ये आयोजित केलेल्या फेस्टिव्हलमध्ये ही पॅन्ट प्रदर्शनात ठेवण्यात आलेली होती. या पॅन्टला 50 मिटर इतके कापड लागले आहे.
पॅन्टची उंची तब्बल 26 फुट (312 इंच) इतकी तर कंबर 15 फुट (180 इंच), मांडी 10 फुट (120 इंच), पँटचे बॉटम 3 फुट (36 इंच) इतके ठेवण्यात आले आहे.
या पॅन्टला बनवण्यासाठी तब्बल 8 दिवस 2 तास इतका वेळ लागला आहे.
पॅन्टची खास वैशिष्ठ्ये म्हणजे बटन सागवान लाकडापासून नक्षीदार काम तयार करुन घेण्यात आले आहे.
खास बेल्टच्या कंपनीकडून पँटचे बेल्ट बनवून घेतले आहे.पॅन्टला आतून लागणारी ग्रीपसुध्दा स्पेशल एम्ब्रॉयडरी तयार करुन घेण्यात आली आहे.
पॅन्टची चेन सुध्दा स्पेशल बनवून घेतली आहे. ओव्हर लॉक मॅचिंग दोऱ्याने मारण्यात आले आहे.