10 दिवसात कापसाच्या दरात दीड हजारांची घसरण
कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. जळगाव जिल्ह्यात जवळपास दीड हजार रुपयांची कापसाच्या दरात घसरण झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजळगाव जिल्ह्यात कापसाच्या दरात जवळपास दीड हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. कापसाचा दरा वाढावा अशी उपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
ल्या 10 दिवसांमध्ये जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात कापसाच्या दरात दीड हजार रुपयांची घसरण झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कापूस बाजारात आणलेला नसतानाही गेल्या दहा दिवसात कापसाच्या एवढी घसरण झाली आहे.
मागील वर्षी कापूस हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना कापसाला कधी नव्हे तर ते 12 हजार रुपये इतका विक्रमी भाव मिळाला होता. त्यामुळं यंदा देखील शेतकऱ्यांना ही वाढ मिळेल अशी अपेक्षा होती.
दर वाढेल या आशेनं शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता कापूस घरातच राखून ठेवणे पसंत केले आहे. मात्र, शेतकऱ्यांचा कापूस बाजारात आलेला नसतानाही सातत्यानं कापसाच्या दरात घसरण होत आहे.
दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळं कापसाच्या दरात कधी वाढ होणार याची शेतकरी वाट बघत आहेत.
जागतिक पातळीवर कापसाचे दर घसरले आहेत. त्याचा परिणाम म्हणून कापसाच्या दरात घसरण होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यात जवळपास वीस लाख गाठी कापसाची निर्यात थांबली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा सातशे कोटी रुपयांचा कापूस हा घरात अडकून पडला असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
जागतिक बाजारपेठेत कापूस दरात झालेली घसरण ही शेतकऱ्यांच्या चिंता वाढवणारी ठरली आहे. कारण राज्यातही कापसाच्या दरात मोठी घसरण होत आहे.
मागील वर्षी कापूस हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना कापसाला कधी नव्हे तर ते 12 हजार रुपये इतका विक्रमी भाव मिळाला होता. त्यामुळं यंदा देखील शेतकऱ्यांना ही वाढ मिळेल अशी अपेक्षा होती.