Sangli News : ग्रेप सिटी वाइनरी सहकारी संस्थेतून 7 प्रकारच्या वाईन; अडचणीमधील द्राक्ष शेतकऱ्यांना मोलाचा आधार
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सावळजमध्ये ग्रेप सिटी वाइनरी सहकारी संस्था वाईन फॅक्टरी सुरू झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फॅक्टरीमधून अवकाळी पावसाच्या तडाख्यातून किंवा निर्यात न होणाऱ्या द्राक्षांमधून 7 प्रकारच्या वाईन बनवता येतात.
त्यामुळे नेहमी अस्मानी संकटाशी लढणाऱ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना (grape farmers) हा एक फार मोठा आधार आहे.
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर अवकाळीचे संकट (unseasonal rain) पाचवीला पुजले आहे. अशा अवकाळी संकटात द्राक्ष बागा सापडल्या, तर या द्राक्षबागांकडे द्राक्ष व्यापारी पाठ फिरवतात.
मग नाईलाजास्तव ही द्राक्ष फेकून द्यावी लागतात आणि शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते.
हेच संकट ओळखून द्राक्ष शेतीचे हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तासगाव तालुक्यातील सावळजमध्ये ग्रेप सिटी वाइनरी सहकारी संस्था उभारली गेली आहे.
ती संस्था अडचणीत सापडलेल्या द्राक्ष शेतकऱ्यांना आधार ठरत आहे. आज फेकून देण्यापेक्षा द्राक्ष माल जात आहे आणि त्यातून थोडेफार का होइना पैसे देखील मिळत आहेत याचे शेतकऱ्यांना जास्त समाधान वाटते.
ग्रेप सिटी वाइनरी पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या आणि व्यापारी द्राक्षं काही कारणांमुळे न नेणाऱ्या तासगाव तालुक्यासह कवठेमहांकाळ, जत, खानापूर, आटपाडी तालुक्यातील द्राक्ष शेतकऱ्यांसाठी आधार आहे. e 8
आज या वाईनरीमध्ये द्राक्षपासून जवळपास 7 प्रकारच्या वाईन बनवल्या जात आहेत. द्राक्षबरोबरच, जांभूळ, करवंद, मँगो, मध यापासून देखील या ग्रेप सिटी वाइनरीमध्ये वाइन बनवली जाते.
तसेच डाळींबपासून वाइन बनवण्याचा प्रयोग करण्यात आला असून तो यशस्वी झाला आहे. त्यामुळे लवकरच डाळिंबपासून देखील वाइन बनवणे सुरु करण्यात येणार आहे.