Sangli Rain : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या सांगली शहरात अर्धा तास मुसळधार पावसाची हजेरी
कुलदीप माने, एबीपी माझा
Updated at:
22 Sep 2023 06:49 PM (IST)
1
गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्याने पावसानं आज सांगली शहरासह काही भागात चांगली हजेरी लावली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दुपारच्या सुमारास अचानकपणे आलेल्या मुसळधार पावसानं सांगलीकर नागरिकांना चिंब भिजवले.
3
अचानकपणे मुसळधार पाऊस पडल्याने सांगलीतील अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळाले.
4
सकाळपासूनच सांगली जिल्ह्यातील वातावरण उष्ण होते.
5
हवेत प्रचंड उकाडा वाढल्यामुळे नागरिक हैराण झाले होते. त्यामुळे पाऊस पडणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
6
दुपारनंतर अचानकपणे पावसाला सुरुवात झाली.
7
तब्बल अर्धा ते पाऊण तास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे सांगलीतील जनजीवन विस्कळीत झाले.
8
मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिक शेतकऱ्यांच्यामध्ये समाधान आहे. मात्र, गणेशोत्सवावर या पावसामुळे सावट निर्माण झाले आहे.