Sleeping Habbit : तुम्ही पण रात्री लाईट लावून झोपता का? ही सवय अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकते
चांगल्या झोपेसाठी योग्य वातावरण असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की रात्री दिवे बंद करून झोपण्याची सवय चांगली असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्हालाही रात्री लाईट लावून झोपण्याची सवय आहे का? जर होय तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण असे केल्याने तुम्हाला मोठा धोका होऊ शकतो. तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
अभ्यासात असे आढळून आले आहे की यामुळे शरीराला अनेक प्रकारची हानी होऊ शकते. फेनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनच्या डॉक्टरांनी केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, जर तुम्ही एक रात्रह लाईट लावून झोपलात तर ग्लुकोज आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. ज्यामुळे शरीराला त्रास होऊ शकतो.
चांगल्या झोपेसाठी योग्य वातावरण असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की रात्री दिवे बंद करून झोपण्याची सवय चांगली असते.
झोपेच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांचा धोका असतो. चला जाणून घेऊया झोपताना दिवे लावण्याचे काय तोटे आहेत?
जेव्हा तुम्ही लाईट लावून रात्रीच्या वेळी झोपता. त्यावेळी तेव्हा झोपेवर परिणाम होतो. याचा हृदय व रक्तवाहिन्यांच्या कार्यावर परिणाम होतो. त्यामुळे रक्तदाबाचा धोका देखील वाढतो.
महिलांवर केलेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की जे लोक टीव्ही किंवा दिवे लावून झोपतात त्यांना लठ्ठपणाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
एका संशोधनात, संशोधकांना असेही आढळून आले की जे लोक रात्री दिवे लावून झोपतात त्यांची सकाळी चाचणी केली असता त्यांच्या शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढलेले दिसते.
अभ्यासानुसार, रात्री दिवे लावून झोपल्याने नैराश्याचा धोका वाढू शकतो. इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून निघणाऱ्या प्रकाशाचा तुमच्या मूडवर सर्वात वाईट परिणाम होतो.
पुरेशी दर्जेदार झोप न मिळाल्याने दुसऱ्या दिवशी सुस्तपणा जाणवतो आणि सतर्क न राहिल्यामुळे अपघाताचा धोका वाढतो.