Sangli News : मिरज तालुक्यातील कवलापूरच्या द्राक्ष उत्पादक शेतकरी बंधूंची गोल्डन कामगिरी! द्राक्षाची नवीन वाण केली विकसित
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवलापूरमधील पोतदार बंधूनी आपल्या द्राक्ष शेतीतील अनुभवाच्या जोरावर द्राक्षाची नवीन वाण विकसित केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशशीदर पोतदार, रवींद्र पोतदार अशी या दोन भावांची नावे आहेत.
या दोघा भावांनी सिद्ध गोल्डन नावाने द्राक्षाची नवीन वाण विकसित केली आहे.
त्यांनी केंद्र सरकारचे सिद्ध गोल्डन नावाने पेटंट देखील मिळवले आहे.
2 एकरात या पोतदार बंधूनी या सिद्ध गोल्डन जातीच्या वाणाची लागवड केली आहे.
जाडी आणि भरपूर लांबी, मनी ड्राॅपिंग कमी तसेच इतर द्राक्षांच्या जातीपेक्षा या सिद्ध गोल्डन जातीच्या द्राक्षांना मिळणारा जादा दर मिळत आहे.
त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे सिद्ध गोल्डन नावाचे नवीन वाण फायदेशीर ठरणार आहे.
या बंधूना नवीन वाणाची संकल्पना चार ते पाच वर्षांपूर्वी सुचली होती.
या वाणासाठी वेगळा खर्च करण्याची गरज नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
या बंधूनी जातीने आणि ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर सिद्ध गोल्डन असे या वाणाचे नाव ठेवले आहे.