Solapur: सिद्धेश्वर कारखाना वाचवण्यासाठी सोलापुरात विराट मोर्चा, मोठ्या संख्येनं शेतकरी मोर्चात सहभागी
सोलापुरात श्री सिद्धेश्वर कारखाना बचाव आणि बोरामणी विमानतळ सुरू करा या मागणीसाठी विराट मोर्चा काढण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिद्धेश्वर साखर कारखाना बचाव कृती समितीच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना बचाव आणि बोरामणी विमानतळ सुरु करा या मागणीसाठी हा मोर्चा निघाला.
या मोर्चात कारखान्याचे सभासद शेतकरी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
श्री सिद्धेश्वर साखर कारखान्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली आणि शहरातल्या होम मैदानापर्यंत हा मोर्चा नेण्यात आला
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, माकप, प्रहार या पक्षाच्या नेतेमंडळींनीही या मोर्चाला पाठिंबा दिला होता.
श्री सिद्धेश्वर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडदी या मोर्चाच्या निमित्तानं पहिल्यांदाच आक्रमक भूमिकेत दिसले.
त्यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाची सरकार कशी दखल घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.
सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची चिमणी सोलापूरच्या होटगी रोड विमानतळच्या विमानसेवेला अडथळा सुरु ठरत असल्याने ही चिमणी पाडून विमानसेवा सुरु व्हावी या साठी सोलापुरात आंदोलन झाले.
या आंदोलनाला आधी उपोषण, नंतर रास्ता रोको आणि आता विराट मोर्चाने उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला
कधीकाळी बचावात्मक पवित्रा घेणारे धर्मराज कडादी आज पहिल्यांदाच आक्रमक भूमिकेत दिसले.
अनेक वर्षांपासून होणाऱ्या आरोपांना आज रस्त्यावर उतरून धर्मराज कडारी यांनी उत्तर दिलं.