Sovereign Gold Bond:सोन्यात गुंतवणूक करण्याची 'सुवर्णसंधी'; 'या' किमतीत केंद्र सरकार विकतंय Gold Bond
Sovereign Gold Bond News: सोन्याच्या दरांत (Gold Price) सध्या तेजी पाहायला मिळतेय. अशातच आता केंद्र सरकारनं (Central Government) सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. सोन्यात गुंतवणूक करण्याची ही उत्तम संधी आहे. त्यामुळे ही संधी अजिबात गमावू नका.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर आज म्हणजेच, सोमवार 19 डिसेंबरपासून सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bond) स्कीम (SGB) 2022-23 चा नवा टप्पा सुरू होणार आहे.
रिझर्व्ह बँक सोमवारी सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम (Sovereign Gold Bond Scheme) जारी करणार आहे. सरकारी गोल्ड बॉन्ड (SGB) 2022-23 ची तिसरी सीरिज 19 डिसेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत सब्सक्रिप्शनसाठी खुली असणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं गोल्ड बॉन्ड्ससाठी इश्यू प्राईज 5,409 रुपये प्रति ग्रॅम ठेवली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दोन टप्प्यांत सरकारी गोल्ड बाँड योजना जारी करणार आहे. डिसेंबर आणि मार्चमध्ये या योजना गुंतवणुकीसाठी खुल्या होतील. या आर्थिक वर्षातील तिसरी सीरिज 19 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तसेच, चौथी सीरिज 2023 मध्ये 6 ते 10 मार्च दरम्यान सुरू होणार आहे.
अर्थमंत्रालयानं यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, गोल्ड बॉन्डमधील गुंतवणुकीचे अर्ज 19 ते 23 डिसेंबर या कालावधीत स्वीकारले जातील. पात्र अर्जदारांना 27 डिसेंबर रोजी बॉन्ड जारी केले जातील. गोल्ड बॉन्ड्सची इश्यू प्राईज 999 शुद्धतेच्या सोन्यावर आधारित असेल. ऑनलाईन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल पद्धतीनं पेमेंट करणाऱ्यांना 50 रुपयांची सूटही दिली जाणार आहे.
सोन्यात गुंतवणुकीसाठी सरकारनं गोल्ड मॉनिटायझेशन योजनेअंतर्गत सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेची सुरुवात केली आहे. रिझव्र्ह बँक वेळोवेळी अटी आणि शर्थींसह गोल्ड बॉन्ड जारी करत असते. या गोल्ड बॉन्डला सरकारी गॅरेंटीही असते.
सॉवरेन गोल्ड बॉन्ड खरेदी करण्यासाठी रोख (Cash), डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) किंवा नेट बँकिंगद्वारे (Net Banking) पेमेंट केलं जाऊ शकतं. सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेअंतर्गत, एक ग्रॅम सोने खरेदी करून गुंतवणूक सुरू करता येते.
कोणत्याही एका आर्थिक वर्षात एका व्यक्तिला सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेत जास्तीत जास्त 4 किलो सोने खरेदी करता येतं. तसेच, अविभाजित हिंदू कुटुंबं आणि ट्रस्टसाठी ही मर्यादा 20 किलो इतकी निश्चित करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या वतीनं हे गोल्ड बॉन्ड रिझर्व्ह बँक जारी करते.
सॉवरेन गोल्ड बॉन्ड बँका (स्मॉल फायनान्स बँका आणि पेमेंट बँका वगळता) स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Stock Holding Corporation of India Limited), नामांकित पोस्ट ऑफिस (Post Office) आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज जसे की नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (National Stock Exchange of India Limited) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लिमिटेड (Bombay Stock Exchange Limited) द्वारे खरेदी केले जाऊ शकतात.