एक्स्प्लोर
Mumbai Pune Express Highway Block : पुणे-मुंबई द्रुतगतीवर ब्लॉकची प्रक्रिया सुरू, पाहा फोटो...
पुणे-मुंबई द्रुतगतीवर ब्लॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे.
pune mumbai express highway
1/8

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे.
2/8

पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर दुपारी 12 ते 2 असा हा दोन तासांचा हा ब्लॉक असेल.
3/8

आयटीएमएस प्रणालीच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जातोय.
4/8

अमृतांजन पुलाच्या अलीकडे आणि पलीकडे म्हणजे किलोमीटर 45 आणि 45.800 किलोमीटरवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली जाणार आहे.
5/8

या कामावेळी पुण्याकडे येणारी अवजड वाहतूक खालापूर टोल नाक्यावर थांबवली जाईल तर हलकी वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे वळविण्यात येईल.
6/8

या दरम्यान मुंबईकडे जाणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरू असेल.
7/8

लवकरात लवकर काम आटपून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
8/8

ITSM प्रणाली बसवण्यात येणार आहे. त्यासाठी हे ब्लॉक्स घेतले जात आहे.
Published at : 12 Oct 2023 01:13 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
करमणूक
मुंबई
























