महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रानामात नेमकी कोणती आश्वासनं आहेत? जाणून घ्या हे 8 आश्वासनं
दि. 20/11/2024 बुधवार रोजी महाराष्ट्रातात विधानसभा निवडणूक (Maharashtra Vidhansabha Election) होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने (MVA) आज दि. 10/11/2024, रविवार रोजी त्यांनी त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केला. जाहीरनामाला 'महाराष्ट्रानामा' असे नाव देण्यात आले आहे. जाहीरनामा जाहीर करताना मल्लिकार्जुन खड़गे, सुप्रिया सुळे, संजय राऊत, नाना पाटोले इत्यादी मान्यवर नेते उपस्थित होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजन्मास आलेल्या प्रत्येक मुलीला 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर 1 लाख रुपये देणार, घरगुती गॅस सिलेंडर 500 रुपयांत देणार.
महिलांचा बस प्रवास मोफत होणार आणि महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार.
सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार, शहरीकरणाला दिशा देण्यासाठी राज्य नागरी आयोग स्थापन करणार.
महायुती सरकारने खाजगी व्यक्तींना दिलेल्या भूखंडांवर फेरविचार करून महायुती सरकारचे पक्षपाती अध्यादेश रद्द करणार.
महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार तसेच एमपीएससी (MPSC) परीक्षांचे निकाल 45 दिवसांत लावणार.
बार्टी, महाज्योती, सारथीमार्फतची शिष्यवृत्ती वाढवणार, शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी देणार तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्यास 50 हजारांची सूट देणार.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती, सुशिक्षीत बेरोजगारांना दरमहा 4 हजार मानधन.
अडीच लाख सरकारी नोकऱ्यांची भरती सुरु करणार, शेतमालाला हमीभाव देणार, पीकविम्याच्या जाचक अटी काढणार.