Vastu Tips : बाथरुममध्ये 'या' छुप्या जागी ठेवा मिठाची वाटी; निगेटीव्ह एनर्जी अन् आरोग्य समस्या झटक्यात दूर, सुख-संपत्तीत होईल अपार वाढ
आपला एक दिवसही असा जाणार नाही, ज्या दिवशी आपण मीठाचा (Salt) वापर करत नाही. जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठाची गरज पडतेच. मीठ फक्त जेवणाचीत चव वाढवत नाही, तर ज्योतिषशास्त्रात आणि वैज्ञानिकदृष्ट्याही त्याला विशेष महत्त्व आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमीठाचा वापर आपण घरात स्वच्छता आणि शुद्धीकरणासाठी केला जातो. बाथरूममध्ये मीठाची वाटी ठेवल्याने फार फरक पडतो.
बाथरूममध्ये आर्द्रता आणि उष्णता निर्माण होते, ज्यामुळे बॅक्टेरिया आणि नकारात्मक ऊर्जा तयार होण्याची शक्यता असते. अशा वेळी मीठाचा वापर करून आपण घरात सकारात्मकता आणू शकतो.
बाथरूममध्ये मीठ ठेवल्यास हवा स्वच्छ राहते आणि बॅक्टेरियांची संख्या कमी होते. मीठ ओलावा शोषून घेते आणि आर्द्रता कमी करते.
बाथरूममध्ये घाणीमुळे वास येतात, ज्यामुळे बाथरूममध्ये पाय ठेवण्याची इच्छाही होत नाही. अशा वेळी मीठ हा वास शोषून घेते आणि वातावरण साफ ठेवते.
बाथरूममध्ये मीठ ठेवल्याने बुरशी आणि बॅक्टेरिया निर्माण होण्याची शक्यता कमी होते.
बाथरूममध्ये मीठ ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. हा एक सोपा आणि प्रभावी उपाय मानला जातो, ज्यामुळे घरात सुख-शांति वाढते.
अंघोळीच्या पाण्यात मीठ मिसळल्यास त्वचेला मऊपणा येतो आणि मृत त्वचाही काढली जाते.
आपण आपल्या नियमित अंघोळीच्या पाण्यात थोडं मीठ टाकल्यास चांगले परिणाम मिळतात.
बाथरुममध्ये मीठ ठेवल्याने फ्रेशनेस जाणवतो. तुम्ही कोपऱ्याचील कडप्प्यावर मीठाची एक वाटी ठेवू शकता.