आधी भेटले, मग बसले, नंतर हसले; ठाकरे-फडणवीस भेटीने वेगळंच राजकारण दिसले; पाहा फोटो
काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उद्धव ठाकरेंना आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, ते या सोहळ्याला उपस्थित राहिले नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर राज्याच्या हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु आहे.
याच अधिवेशनात महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी भेट झालीये.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहचले.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ही सदिच्छा भेट घेतली आहे. तसेच त्यांचं अभिनंदनही केलं.
यावेळी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अगदी निवांत गप्पा देखील झाल्याचं पाहायला मिळालं.
यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई देखील उपस्थित होते.
पण उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या या भेटीने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना मात्र उधाण आलंय.