Numerology : प्रचंड लाजाळू असतात 'या' जन्मतारखेची मुलं; यांना मनातील भावनाही धड करता येत नाही व्यक्त, जिथे तिथे दुसऱ्यांना करतात पुढे
मूलांक 5 ची मुलं थोडी लाजाळू स्वभावाची असतात. तसेच, ही मुलं त्यांच्या भावना इतरांसमोर व्यक्त करू शकत नाहीत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. या मुलांकाचा स्वामी बुध आहे. या व्यक्तींबद्दल आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
अंकशास्त्रानुसार, 5, 14 किंवा 23 जन्मतारखेची मुलं थोडी लाजाळू स्वभावाची असतात आणि त्यांना पटकन एखाद्यासमोर त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाहीत.
कुणाच्या भीतीने नाही, तर लाजाळूपणामुळे ते असं वागतात.
ही मुलं कलेचे जाणकार असतात आणि कलेवर प्रेम करतात.
शिवाय, ही मुलं व्यावहारिक देखील असतात. त्याचबरोबर ते बुद्धिमान असतात आणि त्यांच्याकडे दूरदृष्टीही असते.
मूलांक 5 चे लोक पै पै करुन आपली संपत्ती जोडतात, तसेच ते चांगला बँक बॅलन्स देखील राखतात.
5, 14 किंवा 23 जन्मतारखेची मुलं मोठे उद्योगपती बनतात. हे लोक अल्पावधीतच मोठं साम्राज्य निर्माण करतात.
व्यवसायात नवीन कल्पना वापरून भरपूर पैसा कमावतात. याशिवाय हे लोक मनी माइंडेड असतात.
या लोकांसाठी 5, 14 आणि 23 तारखा अत्यंत शुभ आहेत . म्हणजेच या तारखांना हे लोक काही शुभ कार्य सुरू करू शकतात. तर शुक्रवार आणि बुधवार हे दिवस त्यांच्यासाठी शुभ मानले जातात.