Ajinkya Rahane: टीम इंडियाचा धुरंदर अजिंक्य रहाणेची सोलापुरातील अंगणवाडीला भेट, खिचडीही खाल्ली; फोटो व्हायरल
भारताचा स्टार फलंदाज असलेल्या अजिंक्य रहाणे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर या गावातील अंगणवाडी तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी अंगणवाडीत तयार होणारी खिचडीची चव चाखत चिमुकल्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअर्थ फिट या सामाजिक संस्थेच्यावतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रम पाहण्यासाठी अजिंक्य रहाणे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर या ठिकाणी त्यांनी गाव फिरताना जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाडी तसेच इतर ग्रामपंचायत या ठिकाणी भेटी देत पाहणी केली.
अंगणवाडीतील चिमुकले विद्यार्थी तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येत असलेल्या खिचडी किचनला त्यांनी भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांची खिचडी त्यांनी टेस्ट केली. नंतर मुलांमध्ये बसून गप्पा मारल्या.
अजिंक्य राहणे आपल्या तालुक्यात, आपल्या गावात आल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी अजिंक्य राहणेला पाहण्यासाठी गर्दी केली होती.
अजिंक्य यांनी अंगणवाडीत जाऊन चिमुकल्यांसोबत मनमुरादपणे लहान होण्याचा आनंद घेतला, खिडची खाल्ली व अंगणवाडीतील कर्मचारी यांच्यासोबत गप्पा देखील मारल्या
दरम्यान, नुकतेच अजिंक्य रहाणेनं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी बजावत 9 सामन्यात 448 धावा करुन प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा खिताब जिंकला