Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन भेट घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहायुतीच्या यशाबद्दल दादांना छत्रपती शिवरायांची मूर्ती भेट देत सत्कार केला. याप्रसंगी कराडचे आमदार अतुल भोसले हेही उपस्थित होते. त्यावेळी, अजित पवारांनीही उदयनराजेंचं स्वागत करत आभार मानल.
विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला दैदीप्यमान यश मिळालं असून 288 पैकी 237 जागांवर भाजप महायुतीने विजय मिळवला आहे. त्याबद्दल सर्वच स्तरातून महायुतीच्या प्रमुख नेत्यांचं अभिनंदन केलं जात आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनीही आज महायुतीमधील प्रमुख नेत्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन व सत्कार केला. अगोदर अजित पवार, त्यानंतर सागर बंगल्यावर जाऊन भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचाही सत्कार उदयनराजेंकडून करण्यात आला.
विशेष म्हणजे या भेटीनंतर शिवेंद्रराजेंच्या मंत्री पदासाठी खा.उदयनराजे सरसावले पुढे सरसावल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून सुरू आहे. उदयनराजेंनी 5 आमदारांसह खा. उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांना आश्चर्य व्यक्त केलं आहे.
कोरेगावचे आ.महेश शिंदे, कराड उत्तरचे आ.मनोज घोरपडे, कराड दक्षिणचे आ.अतुल भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह खा.उदयनराजे भोसले यांनी घेतली भेट
शिवेंद्रराजेंना मंत्री करा, मी स्वतः सातारा जिल्ह्यात आणखी भाजपची वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा शब्दच खा. उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणीसांना दिला आहे.