IPL मध्ये 62 अर्धशतके, 4 शतके झळकावली; 3 वर्षे ऑरेंज कॅप पटकावली, यंदा कोणीच संघात घेतलं नाही!
आयपीएल 2025 चा मेगा लिलाव (IPL Mega Auction 2025) 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी पार पडला. सौदी अरेबियातील जेद्दाह येथे याचे आयोजन करण्यात आले होते. (Image Credit- IPL)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमेगा लिलावात 182 खेळाडूंवर 639.15 कोटी रुपये खर्च झाले. यावेळी लिलावात 62 विदेशी खेळाडूंना खरेदी करण्यात आले. (Image Credit- IPL)
लिलावाचे आतापर्यंतचे सर्व विक्रमही मोडीत निघाले. ऋषभ पंत इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपयांना विकत घेतले. (Image Credit- IPL)
आयपीएलच्या मेगा लिलावात अनेक मोठे खेळाडू होते ज्यांना कोणीही संघात घेतले नाही. त्यापैकी पहिले नाव डेव्हिड वॉर्नरचे आहे. (Image Credit- IPL)
वॉर्नरची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. पण वॉर्नरला कोणीही विकत घेतले नाही. (Image Credit- IPL)
विशेष म्हणजे वॉर्नरने आयपीएलच्या कारकीर्दमध्ये एकूण 6 हजार 565 धावा केल्या आहेत. (Image Credit- IPL)
वॉर्नरने आयपीएलमध्ये 62 अर्धशतक आणि 4 शतके झळकावली आहे. (Image Credit- IPL)
तर 2015, 2017 आणि 2019 च्या हंगामात वॉर्नर ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता. (Image Credit- IPL)
महत्वाचे म्हणजे 2016 सालच्या हंगामात वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबादने आयपीएलचं जेतेपद पटकावलं होतं. मात्र यंदा वॉर्नरला कोणत्या संघाने विकत न घेतल्याने आर्श्चय व्यक्त करण्यात येत आहे. (Image Credit- IPL)