Nitesh Rane: हिंदुधर्म रक्षक, हिंदु धर्मासाठी लढणारे नितेश राणे; 'मातोश्री'बाहेर बॅनर झळकले!
भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील वाद महाराष्ट्राला नवा नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे आणि राणेंकडून वारंवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जातात. गेल्या काही दिवसांआधीच लोकसभेचा निकाल लागला.
नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव केला.
लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे.
याचदरम्यान मुंबईतील मातोश्रीबाहेर (उद्धव ठाकरेंचं निवासस्थान) नितेश राणे समर्थकांचे बॅनर लावण्यात आले आहेत.
नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वांद्रे कलानगर येथे हे बॅनर झळकवण्यात आले आहेत.
नितेश राणे यांचे समर्थक मयूर बगेरिया यांनी हे बॅनर लावले आहेत.
23 जून रोजी नितेश राणे यांचा वाढदिवस असल्याने राणे समर्थकांनी बॅनर लावल्याचे दिसून येत आहे.
नितेश राणेंच्या समर्थकांनी लावलेल्या या बॅनरची सध्या राज्यभर चर्चा सुरु आहे.