T20 World Cup 2024 IND vs BAN: टीम इंडिया जोखीम पत्करण्यास तयार...; बांगलादेशविरुद्धच्या सामन्याआधी विक्रम राठोड यांनी उघडले पत्ते!
T20 World Cup 2024 IND vs BAN: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) आज सुपर 8 फेरीत भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात सामना रंगणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होईल.
भारतीय वेळेनूसार रात्री 8 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. आज भारताने बांगलादेशविरुद्ध विजय मिळवल्यास उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल.
भारत आणि बांगलादेशच्या सामन्याआधी भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे.
अक्षर (पटेल) सारखा खेळाडूला आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी असल्याने संघाला खूप आत्मविश्वास मिळतो. त्यामुळे आम्ही फलंदाजी करताना जोखीम घेऊ शकतो. अक्षर पटेल सध्या चांगली गोलंदाजी करत आहे. त्यामुळे, संघाकडे बरेच पर्याय उपलब्ध असतात.
भारताचा संघ सर्वोत्तम संघ सध्या दिसून येत आहे. येथील परिस्थिती आमच्यासाठी योग्य आहे. सध्या संघात चार फिरकीपटू आहेत. आम्ही कधीकधी दोन किंवा तीन फिरकीपटू खेळवू शकतो, असं सांगत विक्रम राठोड यांनी पत्ते उघडले.
बुमराहला विश्रांती देणार?- जसप्रीत बुमराहला विश्रांती देणार असल्याचं सांगितले जात आहे. मात्र बांगलादेविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती मिळणं कठीण आहे. कारण उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. अशा स्थितीत कर्णधार रोहित आपल्या मजबूत संघालाच मैदानात उतरवू शकतो.
शिवम दुबेलाही अंतिम अकरामध्ये आणखी एक संधी मिळू शकते. मधल्या फळीबद्दल बोलायचे झाले तर, जगातील नंबर वन टी-20 फलंदाज सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. यानंतर शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या मॅच फिनिशर्सच्या भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांवर वेगाने धावा करण्याची जबाबदारी असेल.
बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.