हर हर महादेव... देवेंद्र फडणवीस कल्याणेश्वर मंदिरात नतमस्तक, श्रावण महिन्याची अशी सुरुवात
आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून यंदा श्रावण महिन्यात एकूण 5 सोमवार येत आहेत. विशेष म्हणजे श्रावणची सुरुवात आणि शेवटही सोमवारीच होत असल्याचा हा चांगला योग आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रावण महिन्यात शिवशंकरांची पूजा केली जाते, भाविक भक्तांकडून श्रावण महिन्यात महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेत आरतीही केली जाते. महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग असलेल्या मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांची गर्दी होती.
नाशिक-त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, परळी वैजिनाथ, औंढ नागनाथ येथील मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. तसेच, विविध जिल्ह्यात आणि ग्रामीण भागातही शिव मंदिरात भाविक भक्तांची रांग पाहायला मिळाली.
भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागपूरमधील कल्याणेश्वर मंदिरात जाऊन पूजा-आरती केली. यावेळी, महादेवाच्या पिंडीसमोर ते नतमस्तक झाल्याचं पाहायला मिळालं.
देवेंद्र फडणवीस हे मूळ नागपूरचे असून येथील विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. त्यात, हिंदू म्हणूनही ते आपल्या धर्मातील रिती-रिवाज व परंपरा जपताना अनेक सण व उत्सवातून दिसून आलं आहे.
आता, श्रावण महिन्याची सुरुवातही त्यांनी आपल्या नागपूर येथील कल्याणेश्वर शिवमंदिरात जाऊन, दर्शन घेऊन केली.
कल्याणेश्वर हे तेलंगखेडी येथील प्राचीन शिवमंदिर असून ग्रामस्थांचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे, आज सकाळपासूनच मंदिरात भाविक भक्तांनी दर्शनसाठी गर्दी केली होती.