Pune MP List : पुणे तिथे काय उणे, एकट्या पुण्यातून संसदेत सात खासदार, सर्वाधिक खासदार कोणत्या पक्षाचे?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यसभेवर कार्यरत आहेत. शरद पवारांच्या खासदारकीची टर्म एप्रिल 2026 ला संपणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्ह्यात एकूण 3 खासदार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांची काही महिन्यापूर्वी राज्यसभेवर निवड झाली आहे. त्यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ एप्रिल 2030 पर्यंत आहे.
सुप्रिया सुळे यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंंघात पराभव केला आहे. सुप्रिया सुळे यांनी 2019 च्या तुलनेत यावेळी अधिक मतं मिळवत विजय संपादन केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे शिरुर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजीराव आढळराव यांना पराभूत केलं.
पुणे लोकसभा मतदारसंघातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ विजयी झाले आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांना पराभूत केलं. मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात राज्यमंत्रिपद मिळालं आहे. भाजपचे जिल्ह्यात दोन खासदार आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांचा पराभव केला.
प्रफुल पटेल यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देत नव्यानं राज्यसभा निवडणूक लढवली होती. प्रफुल पटेल यांच्या राजीनाम्यानं रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केला. राज्यसभेच्या एका जागेसाठी केवळ एक अर्ज दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली. सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभेची निवडणूक सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढवली होती. पुणे जिल्ह्यातील खासदारांची संख्या आता 7 वर पोहोचली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यापेक्षा सर्वाधिक खासदार पुणे जिल्ह्यातून आहेत.