T20 World Cup 2024 : टीम इंडिया सुपर 8 मध्ये कुणाविरुद्ध लढणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
भारतानं अमेरिकेला पराभूत करत सुपर 8 मध्ये स्थान मिळवलं आहे. भारतानं आतापर्यंतच्या तीन मॅचेस अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये खेळल्या आहेत. कॅनडा विरुद्धची मॅच फ्लोरिडात होणार आहे. मात्र, सुपर 8 च्या लढती वेस्ट इंडिजमध्ये होणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुपर 8 मधील लढतींचा विचार केला असता भारताची पहिली मॅच 20 जूनला होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार ही मॅच सायंकाळी 8 वाजता सुरु होईल. भारताची ही मॅच क गटातील पहिल्या स्थानावर असलेल्या संघासोबत होईल. ही मॅच बारबाडोसमध्ये होईल.
भारत आणि गट ड मधील दुसऱ्या स्थानावरील संघ 22 जूनला आमने सामने येतील. ही मॅच अँटिग्वा मध्ये पार पडणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मॅच 24 जूनला होणार आहे. सेंट लूसियामध्ये दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.
भारत अ गटात पहिल्या स्थानावर आहे. भारतानं सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला आहे. अ गटातून अमेरिका सुपर 8 मध्ये जाणार की पाकिस्तान याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
टी-20 वर्ल्ड कपची पहिली सेमीफायनल 26 जून, दुसरी सेमीफायनल 27 जून आणि फायनल 29 जूनला होणार आहे.