Ratan Tata : टाटा समूहाचा कोल्हापूरच्या उद्योगाशी ऋणानूबंध, दहा वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा
टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे बुधवारी निधन झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरतन टाटा यांच्या निधनानंतर अवघा देश शोकसागरात बुडाला आहे.
फक्त देश नव्हे, तर जगाच्या पाठीवर त्यांच्या उत्तुंग व्यक्तीमत्वाला सलाम करण्यात आला.
टाटा उद्योग समूह आणि कोल्हापूर उद्योग जगताचा नेहमीच ऋणानुबंध राहिला.
10 नोव्हेंबर 2013 रोजी आर.आय.टी.कॉलेज, सांगलीमध्ये पदवीदान समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून रतन टाटा उपस्थित होते.
त्यावेळी कोल्हापूरातील अनेक नामवंत उद्योजकांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली होती.
रतन टाटा यांच्या भेटीचा अविस्मरणीय फोटो कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या फोटो गॅलरीत लावण्यात आला आहे.
कोल्हापूरच्या उद्योगांना ऑटोमोबाईल सेक्टरमधील प्राण समजला जातो.
कोल्हापूरचे अनेक उद्योजक टाटा समूहाचे प्रमुख सप्लायर आहेत.
गुणवत्तेशी कधीही तडजोड केली नसल्याने देशपातळीवर नेहमीच कोल्हापूर उद्योग जगताचे नाव घेतले जाते.
गिअर कव्हर,कव्हर फ्रण्ट टॉप, ट्कचे पार्ट, घाटगे-पाटील इंड, झंवर ग्रुप, महाबळ मेटल आणि बरेच उद्योग गेली अनेक वर्षे टाटा उद्योग समूहास विविध सुट्या भागांचा पुरवठा करतात.
टाटा उद्योग समुहामुळे उच्च गुणवत्ता कशी असते, यामध्ये सातत्य कसे राखायचे, वेळेचे नियोजन आणि अशा अनेक गोष्टी ज्या येथील उद्योजकांना शिकण्यास मिळाल्या. रतन टाटा कोल्हापूर उद्योग नगरीचे प्रेरणा स्थान आहे.