पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
महाराष्ट्र आणि विशेषत: मुंबई दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज खारघर येथील इस्कॉन मंदिराचेही उद्घाटन केले. खारघरमधील हे मंदिरा जगातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनऊ एकरात पसरलेले हे भव्य आणि प्रशस्त मंदिर आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर आहे. मंदिराच्या उद्घाटनापूर्वी सकाळी पंतप्रधान मोदींनी आयएनएस सूरत, आयएनएस नीलगिरी या दोन युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर या पाणबुडीचे उद्घाटन केले.
या मंदिर उद्घाटन सोहळ्याप्रसंगी भाषण करताना मोदींनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख चक्क देवाभाऊ असा केला.
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ असे म्हणत मोदींनी देवेंद्र फडणवीस यांना नामोल्लेख केल्याने व्यासपीठावर उपस्थित देवेंद्र फडणवीसांनीही गोड स्माईल देत आनंद व्यक्त केला.
मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शेजारीच असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हा नामोल्लेख ऐकताच हलकेसे स्माईल दिल्याचं पाहायला मिळालं.
राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आल्यानंतर भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख देवाभाऊ असा करण्यात आला. निवडणूक प्रचारातही देवाभाऊ याच नावाने भाजपने प्रचार केला
दरम्यान, खारघरमधील या मंदिराचे बांधकाम करण्यास 12 वर्षे लागली असून त्यासाठी 170 कोटी रुपये खर्च आला आहे. या भव्य-दिव्य मंदिराचे नाव श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिर असे आहे.