44 वर्षाच्या श्वेता तिवारीचं मनोहारी सौंदर्य, लेकीपेक्षा दिसते भारी; नव्या फोटोशूटने चाहते घायाळ!
श्वेता तिवारी या अभिनेत्रीला देशभरात लाखो लोक ओळखतात. तिच्या अभिनयाचे अनेकजण दिवाने आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोबतच तिच्या सौंदर्यानेही अनेकांवर भुरळ घातलेली आहे. ती सध्या 44 वर्षांची आहे. सोबतच ती दोन मुलांची आई आहे. पण तरीदेखील ती तेवढीच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. तिच्या याच रुपाचे सगळे दिवाणे आहेत.
दरम्यान, श्वेता तिवारी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिच्या आयुष्यात नेमकं काय चालू आहे, हे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना सांगत असते. नुकतेच तिने एक फोटोशुट केलं आहे. या फोटोशुटमध्ये तिच्या भन्नाट लुकने अनेकांनी भुरळ घेतली आहे.
तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. विशेष म्हणजे इन्स्टाग्रामवर फोटो टाकताच ते व्हायरल झाले आहेत. अवघ्या एका तासात जवळपास एक लाख लोकांनी या फोटोंना लाईक केलं आहे.
या फोटोमध्ये श्वेता तिवार ब्राऊन रंगातील बॉडिकोन ड्रेसमध्ये दिसत आहे. तसेच तिचे केस बांधलेले आहेत.
तिने परिधान केलेला ब्राऊन रंगाच्या ड्रेसला साईडकट डिझाईन आहे. याच अनोख्या ड्रेसने तिच्या सौंदर्यात भरच पाडली आहे.
या ड्रेसमध्ये तिने वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशुट केलं आहे. ड्रेससोबत तिने बोल्ड मेकअप, स्मोकी आईज तसेच केसांचा बन तयार करून तिचे तिचा मेकअप पूर्ण केलाय.
हो फोटो पोस्ट करताना तिने दोन स्पायडर (कोळी) इमोजी टाकले आहेत. या फोटोंवर शेकडो लाकांनी कमेंट्स केल्या आहेत.
श्वेता तिवारीच्या सौसंदर्यांची लोकांनी भरभरून प्रशंसा केली आहे. इन्स्टाग्रामवर तिला 50 लाखांपेक्षा जास्त लोक फॉलो करतात.