Pratika Rawal : 20 चौकार, 1 षटकार अन् 154 रन, भारताच्या प्रतिका रावलने करून दाखवलं, वाघीणीने 19 वर्षांचा रेकॉर्ड मोडला!
भारतीय महिला क्रिकेट संघाने बुधवारी आयर्लंडविरुद्ध इतिहास रचला. राजकोटमधील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने 435 धावा करून एक नवा विक्रम रचला. भारताने निर्धारित 50 षटकांत 5 गडी गमावून इतक्या धावा केल्या. महिला क्रिकेटमध्ये भारताची ही सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रतिका टीम इंडियासाठी ओपनिंग करण्यासाठी आली होती. तिने 129 चेंडूंचा सामना करत 154 धावा केल्या. यादरम्यान तिने 20 चौकार आणि 1 षटकार मारला.
प्रतीका हिने तिच्या धमाकेदार खेळीने एक मोठा विक्रम मोडला आहे. ती भारतीय महिला संघासाठी एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारी तिसरी फलंदाज बनली आहे.
भारताकडून दीप्ती शर्माने आयर्लंडविरुद्ध 217 पैकी 188 धावा केल्या. महिला संघाच्या कोणत्याही खेळाडूने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
हरमनप्रीत कौर यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. हरमनप्रीतने 2017 मध्ये 171 धावांची खेळी खेळली.
आता प्रतीका हिने 19 वर्षांचा जुना विक्रम मोडला आहे. तिने जया शर्माला मागे सोडले. 2005 मध्ये जयाने भारतासाठी 138 धावांची खेळी खेळली होती.