G7 Summit: पंतप्रधान मोदींनी घेतली जो बायडन, जस्टिन ट्रुडो आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट, पाहा फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 परिषदेत सहभागी होण्यासाठी जर्मनीत आहेत. G7 देशांचे प्रमुख, G-7 भागीदार देशांचे नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना भेट देताना पंतप्रधान मोदी दिसले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जर्मनीत पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट घेतली.

जर्मनीत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचीही पंतप्रधान मोदींनी भेट घेतली.
G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेल्या पंतप्रधान मोदींनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचीही भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्स यांची भेट घेतली.
रविवारी जर्मनीतील म्युनिकमध्ये पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने भारतीय जमले होते.
महिला आणि मुलेही पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी आणि त्यांना पाहण्यासाठी आतुर दिसत होते.
पंतप्रधान मोदींनी म्युनिकमध्ये महिला आणि त्यांच्या मुलांचीही भेट घेतली.