PHOTO : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांचं भरपावसात भाषण
अकोल्यात भारतीय बौद्ध महासभेने आयोजित केलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांनी हजेरी लावली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअकोला क्रिकेट क्लबवरील मैदानावर हा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम पार पडला.
पाऊस असतानाही लोकांनी सभेला चांगलीच गर्दी केली होती.
प्रकाश आंबेडकर भाषण देत होते, तेव्हा पाऊस सुरु झाला परंतु त्यांनी आपले भाषण न थांबवले नाही.
विशेष म्हणजे यावेळी पावसात न थांबता भाषण देत राहणं हा ट्रेंड ज्यांनी सुरु केला त्या शरद पवार यांनाही प्रकाश आंबेडकर यांनी टोला लागवला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यातील पावसातील सभा गाजवल्यानंतर पावसात सभा देणं हे राजकारण्यांमध्ये ट्रेंड झाला आहे.
शरद पवार यांच्यानंतर जयंत पाटील, आदित्य ठाकरे, त्यानंतर काही दिवसापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भरपावसात सभा घेत भाषण केलं होतं.
आता या पंक्तीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचंही नाव सामील झालं आहे.
राजकीय वैर न ठेवता मनाचा मोठेपणा दाखवण्याचं जे मोठेपण बाळासाहेब ठाकरेंमध्ये होतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये आणि शरद पवारांमध्ये नाही, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.