Nitesh Rane: भगवी शाल घालून फडणवीसांचा सत्कार; उपमुख्यमंत्र्याच्या कृतीने लाजले आमदार नितेश राणे
भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन करण्यासाठी भाजप नेत्यांची रांग लागली असून आमदार खासदार, मंत्री सागर बंगल्यावर आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनीही आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील निवडणुकांत महायुतीच्या विजयाबद्दल सत्कार केला.
नितेश राणे यांनी हिंदू आणि भगवा या दोन मुद्द्यांना घेऊन निवडणुकीत प्रचार केला. तसेच, गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी हिंदुंच्या मुद्द्यावरुन रान उठवलं होतं.
भाजपमधील एका हिंदू नेतृत्व म्हणून ते समोर आल्याचं पाहायला मिळालं, हिंदू जनजागृती मोर्चाच्या माध्यमांतूनही त्यांनी लक्ष वेधलं होतं.
नितेश राणे यांनी देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केलं, त्यावेळी भगवी शाल आणि बुके देऊन सत्कार केला. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी तीच भगवी शाल नितेश राणेंचं अभिनंदन केलं.
नितेश राणेंकडून आधी भगवी शाल घालत फडणवीसांचे अभिनंदन केले, यावेळी राणेंच्या कामाचे कौतुक करताना फडणवीसांनी तीच भगवी शाल राणेंच्या खांद्यावर ठेवली.
दरम्यान, यंदाच्या निवडणूक प्रचारात भाजपने एक है तो सेफ है.. असे म्हणत प्रचारयंत्रणा राबवली, धार्मिक मुद्द्यावरुन मतदारांना आवाहन केल्याचं दिसून आलं.