Maharashtra Assembly Elections Result 2024 : नव्या विधानसभेत नातेवाईकांचा विरळा योगायोग, पाहा यादी
नव्या विधानसभेत यंदा बऱ्याच नातेवाईकांचा विरळा पाहायला मिळणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसख्खे भाऊ, भाऊ-बहिण, दोन मावसभाऊ अशा जोड्या यंदाच्या विभानसभेत पाहायला मिळणार आहेत.
खासदार वर्षा गायकवाड यांची बहिण ज्योती गायकवाड या धारावी मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.
राज्यसभेवर खासदार म्हणून गेलेल्या सुनेत्रा पवार या संसदेत आणि अजित पवार बारामतीत विजयी झाल्याने विधानसभेत असणार आहेत.
नुकताच भाजपात प्रवेश केल्यानंतर राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेलेल्य अशोक चव्हाणांच्या लेकीनेही आमदारकी मिळवली आहेत. श्रीजया चव्हाण या भोकरमधून विजयी झाल्या आहेत.
आदित्य ठाकरे वरळीतून तर वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्वमधून विजयी होत दोन सख्खे मावसभाऊ विधानसभेवर निवडून गेले आहेत.
सिंधुदुर्ग-रत्नागिरीमधून खासदार झालेल्या नारायण राणेंच्या दोन्ही मुलांनी आमदारकी मिळवली आहे. निलेश राणे हे कुडाळमधून तर नितेश राणे कणकवलीमधून आमदार म्हणून निवडून गेलेत.
माजी खासदार रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव या कन्नड विधानसभेतून तर मुलगा संतोष दानवे हे भोकरदनमधून आमदारम म्हणून निवडून गेले आहेत.