PHOTO : किरीट सोमय्यांच्या डॉक्टरेटविरोधात युवासेनेचं मुंबई विद्यापीठात आंदोलन
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई विद्यापीठातून मिळवलेल्या डॉक्टरेट विरोधात युवासेना कलिना विद्यापीठात आंदोलन केलं.

Yuva Sena Protest Against Kirit Somaiya
1/9
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई विद्यापीठातून मिळवलेल्या डॉक्टरेट विरोधात युवासेना कलिना विद्यापीठात आंदोलन केलं.
2/9
युवासेनेच्या मते किरीट सोमय्या यांनी मुंबई विद्यापीठातून मिळवलेली डॉक्टरेट बोगस आहे.
3/9
किरीट सोमय्या यांनी मिळवलेल्या पीएचडीची माहिती विद्यापीठातून मिळत नसल्याची तक्रार युवासेनेने केली आहे.
4/9
सोमय्या यांच्या पीएचडी प्रबंधाची प्रत नेमक्या कुठल्या विभागात आहे किंवा आहे कि नाही याबाबतची माहिती देण्यास विद्यापीठाकडून मागील तीन महिन्यापासून टाळाटाळ होत असल्याचा युवासेनेचा आरोप आहे.
5/9
किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई करावी यासाठी युवासेनेचे मुंबई विद्यापीठ कालिना कॅम्पस इथील आंबेडकर भवन इथे धरणं आंदोलन केलं.
6/9
किरीट सोमय्या यांनी चुकीच्या पद्धतीने डॉक्टरेट मिळवल्याचा आरोप कर युवासेनेने आवाज उठवला आहे.
7/9
किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांची पोस्टर्स दाखवून किरीट सोमय्या यांचे डॉक्टरची चौकशी व्हावी अशी मागणी युवासेनेने केली.
8/9
मुंबई विद्यापीठाने नील सोमय्या यांना अवघ्या 14 महिन्यात पीएचडी कशी बहाल केली याचीही चर्चा आहे.
9/9
युवासेनेने या संदर्भात ते कुलसचिवांना त्यासोबत कुलगुरुंना पत्र देणार आहेत.
Published at : 16 Nov 2022 01:36 PM (IST)