Ambabai Mandir Kolhapur : अंबाबाई मंदिरात दोन कोटींचे दान; कमी कालावधीत देवीसाठी भाविकांकडून भरभरून दान
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्र आणि दिवाळी दरम्यान अर्पण केलेल्या दानाची मोजणी पूर्ण झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंदिराच्या 12 दानपेट्यांमध्ये 2 कोटींहून अधिक रक्कम दान करण्यात आली.
इतक्या कमी कालावधीत भाविकांनी दिलेली ही सर्वाधिक रक्कम आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे म्हणाले, “कोविडनंतर पहिल्यांदाच मंदिर नवरात्र आणि दिवाळी दरम्यान भाविकांसाठी खुले होते आणि 25 लाखांहून अधिक भाविकांनी मंदिराला भेट दिली.
मंदिरातील सर्व 12 दानपेट्या भरल्यानंतर त्याची मोजणी करण्यात आली.
गरुड मंडप परिसरात देवस्थान समिती अधिकारी, 50 सुरक्षा रक्षक आणि देवस्थान आणि बँक कर्मचारी यांच्या उपस्थितीत मोजणी प्रक्रिया पार पडली.
ही संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली पार पडली
मंदिरात यंदा सलग दोन दिवस किरणोत्सव यशस्वी पार पडला.
दोन्ही दिवशी मावळतीची किरणे देवीच्या रुपावर पडली.
तिसऱ्या दिवशी ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव होऊ शकला नव्हता.