Layoffs: नोकरी जाण्याची भीती, खर्च कसा भागवायचा? या टिप्स तुम्हाला ठरतील फायदेशीर
जगभरात आर्थिक मंदीचे सावट दिसू लागले आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपातीचे धोरण सुरू केले आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात नोकरी जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमागील काही दिवसात अॅमेझॉन, डिस्ने, ट्वीटर, मेटा आदी कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. नोकरी गेल्याने आणि दुसरे उत्पन्न स्रोत नसल्याने अनेकांना घर खर्चाची तजवीज करण्यास अडचणी निर्माण होतात.
नोकरी गेल्यास घर खर्च, गृह कर्ज, कार कर्जाचे हप्ते, मुलांच्या शाळांची फीस आदी खर्चाची तजवीज करण्यास मोठ्या अडचणी दिसून येतात.
जर तुम्हाला नोकरी जाण्याची भीती असेल अथवा नोकरी गेली असल्यास या काही टिप्स फॉलो केल्यास घर खर्चाचे व्यवस्थापन करण्यास काही प्रमाणात मदत होईल.
बाहेर फिरण्यास जाणे, थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे, रेस्टॉरंटमध्ये जेवणे आदी अनावश्यक खर्च तातडीने बंद करा.
अनावश्यक खर्चाला कात्री लावा. आवश्यक असेल तिथेच खर्च करा.
महागड्या वस्तू खरेदी करण्याऐवजी काही दिवस स्वस्तातील वस्तू खरेदी करा. जर तुम्ही महागड्या शॉपिंग मॉलमधून खरेदी करत असाल तर काही दिवसांसाठी हा खर्च टाळा.
आगामी काही दिवसात तुम्ही कार, टीव्ही, रेफ्रिजेरेटर सारख्या महागड्या वस्तूंची शॉपिंग करणार असाल तर ही खरेदी काही दिवसांसाठी पुढे ढकलावी. नोकरी मिळाल्यानंतर अथवा स्थैर्य आल्यानंतर हा खर्च करावा.
तुम्हाला दुसरी नोकरी मिळत नसेल तर काही दिवस पार्ट टाइम जॉब करा.
पार्ट टाइम जॉबमुळे तुम्ही घर खर्चासाठी किमान रक्कम जमवू शकाल. त्यासोबत इतरत्र नोकरी शोधणे सुरू ठेवावे.