Maharashtra Vidhan Sabha Election: तीन मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, तीन विरोधी पक्षनेते, पाच वर्षांच्या टर्ममध्ये महाराष्ट्रात काय काय घडलं?
महाराष्ट्रात 2019- 2024 या टर्ममध्ये पहिलं सरकार देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्थापन केलं होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. मात्र, सर्वोच्च न्यायालयातच्या आदेशानंतर व्हिडीओग्राफी करत बहुमत सिद्ध करावं लागणार होतं. मात्र, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा दिला. हे सरकार 72 तासांच्या आत कोसळलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 2019-2024 या टर्ममधील दुसरं सरकार होतं. या सरकारमध्ये अजित पवार नंतर उपमुख्यमंत्री बनले. ठाकरेंच्या सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते.
एकनाथ शिंदे यांचं सरकार जून 2022 मध्ये स्थापन झालं. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले, जुलै 2023 मध्ये अजित पवार देखील उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी झाले.
अजित पवार यांनी 2019-2024 तीनवेळा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकनाथ शिंदे सरकारच्या काळात ते एक वर्ष विरोधी पक्षनेते होते. देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री बनले.
अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर मविआत काँग्रेसकडे सर्वाधिक आमदार होते. काँग्रेसनं विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात शेवटच्या काही महिन्यांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये जाऊन मंत्री बनले होते. त्यामुळं रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदावर त्यावेळी देखील विजय वडेट्टीवार यांना संधी देण्यात आली होती.