Astro Tips: वाईट काळ सुरू होण्यापूर्वी मिळतात 'हे' संकेत; जरा जपुनच राहा, नाहीतर...
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रामध्ये अशा काही संकेतांचं वर्णन केलं आहे, जी तुमची वाईट वेळ येण्याआधी दिसून येतात.
Astro Tips | Chanakya Niti
1/9
चाणक्यनितीनुसार, जर तुम्हाला हे संकेत मिळाले तर याचा अर्थ घरातील बरकत जाऊन तुमची वाईट वेळ सुरू होणार आहे, हे समजून जा.
2/9
आचार्य चाणक्य सांगतात की, घरातील तुळशीचं रोप अचानक सुकून गेलं, तर ही गोष्ट शुभ मानली जात नाही. तुळशीचं सुकणं तुमच्या वाईट वेळचा निरोप आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही.
3/9
आचार्य चाणक्यांनुसार, ज्या घरांमध्ये तुळशीचं रोप अचानक सुकायला लागतं, त्या घरात अनेक आर्थिक अडचणी, भांडणं यांसारख्या समस्या निर्माण होऊ लागतात.
4/9
आचार्य चाणक्यांनी सांगितल्यानुसार, घरात ठेवलेलं तुळशीचं रोप सुकणं हे काही आगामी आर्थिक समस्येचं लक्षण देखील असू शकतं.
5/9
आचार्य चाणक्य यांच्या मते, जर घरामध्ये अचानक संकटं वाढली आणि घरातील सदस्यांमधील प्रेम कमी होऊन त्याचं रुपांतर भांडणांमध्ये होत असेल तर ते अशुभ लक्षण आहे.
6/9
आचार्य चाणक्य यांच्या मते, घरातील वाढती संकटं, भांडणं वाढणं म्हणजे, समजून जा की, कोणतं ना कोणतं मोठं संकट तुमची वाट पाहातंय.
7/9
त्यामुळे तुमच्या घरात विनाकारण वाद होत असतील तर ते शांततेनं सोडवा आणि वाद वाढवू नका.
8/9
घरातील आरसा अचानक फुटला तर ते देखील अशुभ लक्षण आहे. याचा अर्थ असा आहे की, संकट तुमच्या दारापर्यंत येऊन उभं राहिलं आहे.
9/9
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)
Published at : 16 Oct 2024 07:22 AM (IST)