Lok Sabha Elections 2024: आम आदमी पक्ष भ्रष्टाचारानं बरबटलेला; अण्णा हजारेंचं नाव घेत योगी आदित्यनाथांचे गंभीर आरोप
Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आम आदमी पक्षावर (AAP) वर जोरदार निशाणा साधला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 20 मे 2024 रोजी अरविंद केजरीवालांवर अनेक गंभीर आरोप केले. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील AAP वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचारानं बरबटलेली आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
दिल्लीतील जाहीर सभेत योगी आदित्यनाथ यांनी 'आप'नं राष्ट्रीय राजधानी दिल्लीला 'नरक' बनवल्याचा दावाही केला.
योगी आदित्यनाथ म्हणाले की, विरोधी पक्षांचा समूह 'इंडिया' ही विकासासाठी नव्हे तर भ्रष्टाचारासाठी स्थापन झालेली आघाडी आहे.
मयूर विहार फेज-3 येथील निवडणूक रॅलीदरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नावाचा उल्लेख करत 'आप'ला कोंडीत पकडलं.
अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसविरोधात आंदोलन करणाऱ्या आपचं दुहेरी चरित्र असल्याचं योगी आदित्यनाथ म्हणाले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, आप हा पहिला पक्ष आहे, ज्याचं नाव भ्रष्टाचाराच्या आरोपपत्रात आरोपी म्हणून नोंदवलं गेलं आहे.
मुख्यमंत्री योगी म्हणाले, आप भ्रष्टाचारात बुडाली आहे. आपण त्यांना शक्तिशाली होऊ देऊ नये. तुम्ही त्यांना मत दिल्यास ते रक्तबीज (राक्षस) सारखे पसरतील.